गौरी खानच्या रेस्टॉरंटमधील बनावट पनीर प्रकरणी मुख्य शेफचं विधान; म्हणाला…
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या 'तोरी' रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर दिलं जात असल्याचा आरोप सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सार्थक सचदेवाने केला होता. यानंतर रेस्टॉरंटने हे दावे फेटाळले. यानंतर आता मुख्य शेफ स्टीफन गडित यांनी सांगितलं की, या आरोपांमुळे रेस्टॉरंटला फायदा झाला आणि त्यांचा व्यवसायही वाढला. त्यांनी स्पष्ट केलं की, रेस्टॉरंट उच्च दर्जाचे अन्न पुरवते आणि ग्राहकांच्या अन्नाची तपासणी केली जाते.