हातात टाळ घेत भजनात दंग झाली गौतमी पाटील, खास व्हिडीओही केला शेअर
लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील सोशल मीडियावर तिच्या नृत्यकौशल्यानं प्रसिद्ध आहे. नुकताच तिनं वारकऱ्यांची सेवा करतानाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये गौतमी वारकऱ्यांबरोबर भजन-कीर्तन करण्यात दंग झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच तिनं वारकऱ्यांना खाऊवाटपही केलं, ज्यामुळे तिचं कौतुक होत आहे. गौतमीने झी मराठीच्या 'देवमाणूसमधला अध्याय' आणि 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमातही सहभाग घेतला आहे.