“मराठीचा अपमान खपवून घेणार नाही”, हिंदी भाषा सक्तीबद्दल उत्कर्ष शिंदेची पोस्ट; म्हणाला…
महाराष्ट्रात इयता पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून वाद सुरू आहे. सरकारने विरोधानंतर अनिवार्य शब्द हटवला. गायक उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर हिंदी सक्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की, "ज्ञानाची भक्ती करायची असते सक्ती नाही." त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टॅग करून मराठी अस्मितेचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे. अनेकांनी त्याच्या पोस्टला पाठींबा दिला आहे.