कन्नड भाषा वाद प्रकरणी कमल हासन यांचा माफी मागण्यास नकार, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला
दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांचा 'ठग लाईफ' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, परंतु कन्नड भाषेबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे ते अडचणीत आले आहेत. कमल हासन यांनी 'कन्नड भाषा तमिळ भाषेतून जन्माला आली' असे विधान केले होते, ज्यामुळे रोष निर्माण झाला. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे. 'ठग लाईफ'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली असून, सुनावणी १० जूनपर्यंत पुढे ढकलली आहे.