कन्नड भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कमल हसन यांची उच्च न्यायालयात धाव
दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांच्या 'ठग लाईफ' चित्रपटाच्या म्युझिक लाँच कार्यक्रमात कन्नड भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कर्नाटका येथील लोकांनी कमल हसन यांच्यावर तक्रार दाखल केली असून, माफी मागण्याची मागणी केली आहे. कर्नाटका फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने माफी न मागेपर्यंत चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. कमल हसन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.