“कन्नड भाषेचा जन्म तामिळ भाषेतून झालाय”, अभिनेता कमल हासनच्या विधानावरून वाद!
सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन आपल्या विधानामुळे अडचणीत सापडला आहे. 'Thug Life' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी, तामिळ भाषेशी असलेलं आपलं नातं अधोरेखित करताना, कन्नड अभिनेता शिवराजकुमारकडे पाहून कमल हासन म्हणाला की, "तुमची भाषा तामिळमधूनच जन्माला आली आहे." यामुळे कर्नाटक रक्षण वेदिका आणि कर्नाटक भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. कर्नाटकात त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची धमकी दिली आहे.