पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रवीण तरडेंचा मदतीचा हात, नेटकऱ्यांकडून कौतुक
महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून, आर्थिक कोंडी झाली आहे. या संकटात मराठी दिग्दर्शक प्रवीण तरडे शिवार संसद संस्थेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना मदत करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे मदतीचे आवाहन केले आहे. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.