“गोतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलायस, आता तर…”, मराठी अभिनेत्याचा संताप;
नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारने पुण्यात रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. आरोपी चालकाला अटक झाली असून कार गौतमीच्या नावावर असल्याने तिलाही नोटीस बजावली आहे. मराठी अभिनेता पवन चौरेने गौतमीवर संताप व्यक्त करत तिच्यावर महाराष्ट्राचा बिहार केल्याचा आरोप केला. त्याने गौतमीच्या वर्तनावर टीका करत रिक्षाचालकाच्या स्थितीबद्दल विचारपूस न केल्याबद्दल निषेध व्यक्त केला.