‘सैयारा’मुळे मराठी चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ थिएटर बाहेर; मनसेनं दिला आंदोलनाचा इशारा
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामुळे मराठी चित्रपटांना फटका बसत आहे. 'येरे येरे पैसा ३' हा चित्रपट सिनेगृहातून काढला जात असल्याने मनसेने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडे यांनी मराठी चित्रपटांची गळचेपी केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.