“सावकाराच्या तुकड्यांवर दोनचार सोडले तर…”, मराठी लेखकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले…
राज्य सरकारकडून हिंदी सक्तीच्या प्रयत्नानंतर राज्यभरात संताप उसळला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चाचा इशारा दिल्याने सरकारने हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घेतला. विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आले. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. लेखक अरविंद जगताप यांनीही पोस्ट शेअर करत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे स्वागत केले.