नाना पाटेकर-मकरंद अनासपुरेंनी जपलं समाजभान, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर; म्हणाले…
मराठवाडा, धाराशिव, सोलापूरसह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटात 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून इतरांनाही मदतीचं आवाहन केलं आहे. या पुरामुळे ३० जिल्हे बाधित झाले असून, ५० लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे.