१६ व्या वर्षी शरीरात कर्करोगाची गाठ ते विश्वसुंदरी; यंदा कोणी जिंकला ‘मिस वर्ल्ड’चा खिताब?
हैदराबादमधील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये ३० मे (शनिवार) ७२ वा 'मिस वर्ल्ड' सोहळा पार पडला. मनोरंजन जगतातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य कार्यक्रमात मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगश्रीला 'मिस वर्ल्ड २०२५'चा खिताब देण्यात आला. ओपल सुचाता ही थायलंडच्या फुकेतमध्ये लहानाची मोठी झाली. ती आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी घेत असून ती मॉडेलसुद्धा आहे. स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी तिने बरंच सामाजिक कार्य केलं आहे.