“हा महिलांचा सामूहिक अपमान”, मोदी सरकारच्या घर-घर सिंदूर मोहिमेवर गायिकेची टीका, म्हणाली…
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, मोदी सरकारने महिलांना सिंदूर भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जूनपासून भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन सिंदूर वाटतील. यावर प्रसिद्ध गायिका नेहा सिंह राठोडने या मोहिमेवर टीका केली आहे. तिने म्हटले की, सरकार महिलांचे भावनिक शोषण करत आहे आणि रोजगाराच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. तसंच नेहाने महिलांना भाजप कार्यकर्त्यांकडून सिंदूर न घेण्याचे आवाहन केले आहे.