बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी प्रसिद्ध गायिकेची पोस्ट; म्हणाली, “जय शाह यांना…”
यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वर्षांनी विजय मिळवला. विजयानंतर बंगळुरूत विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. याबद्दल प्रसिद्ध गायिका नेहा सिंह राठोडने सरकारवर टीका केली. या दुर्दैवी घटनेला सरकारचं अपयशदेखील म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले, तर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांच्या मदतीची घोषणा केली.