“रस्त्यावरची कुत्री, कबुतरं, हिंदी सक्ती यापेक्षा…”, सुमीत राघवनची पोस्ट चर्चेत; म्हणाला
मुंबई आणि आसपासच्या शहरांतील खराब रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अभिनेता सुमीत राघवनने याबाबत सोशल मीडियावर रोष व्यक्त केला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. व्हिडीओमध्ये जर्मनीतील तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे, ज्यामुळे रस्ते पावसाचे पाणी शोषून घेतात.