“लायकी असेल तेवढंच बोलावं”; सुशील केडियांनी माफी मागताच मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला…
मुंबईतील व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मराठी शिकणार नसल्याचं आव्हान दिलं होतं. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसची तोडफोड केली. नंतर सुशील यांनी माफी मागितली आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. यांवर मराठी अभिनेता अभिजीत केळकरने प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि सुशील केडियाच्या वक्तव्यावर टीकाही केली आहे.