जय भानुशालीबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल माही विजची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाली…
माही विज आणि जय भानुशाली यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर माहीने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा पसरत होत्या. thou.ghtful16 या इन्स्टाग्राम पेजवर त्यांच्या विभक्त होण्याची पोस्ट शेअर झाली होती, ज्यावर माहीने कमेंट करत खोट्या बातम्या पसरवू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करेन, असे म्हटले. जयनेही लेक ताराबरोबरचा व्हिडीओ शेअर करत नात्यातील दुराव्याच्या चर्चांना खोटे ठरवले.