“लोकांच्या आरोग्याशी खेळणं थांबवा”, ‘वेड’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली…
'वेड' चित्रपटातील अभिनेत्री जिया शंकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर डॉक्टरांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. तिने मुंबईतील डॉक्टरांवर टीका करताना, त्यांच्या अयोग्य वागणुकीमुळे तिला नरकासमान अनुभव आल्याचे म्हटले आहे. जियाने डॉक्टरांबद्दल आदर व्यक्त केला असला तरी, त्यांच्यावर विश्वास ठेवणे चूक ठरल्याचे सांगितले. जियाच्या या पोस्टमुळे तिचा त्रास आणि खदखद स्पष्टपणे दिसून येत आहे.