…म्हणून अमृता सुभाषला घ्यावी लागली होती मानसोपचार तज्ज्ञांची मदत
अभिनेत्री अमृता सुभाष लवकरच 'जारण' या चित्रपटातून झळकणार आहे. सध्या ती प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अनिता दातेही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अमृताने 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भूमिकेसाठी तिने मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली होती. 'जारण' हा चित्रपट रहस्य, गूढ व अघोरी परंपरेवर आधारित आहे. हृषिकेश गुप्ते यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होणार आहे.