अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित सहकलाकाराची खास पोस्ट, म्हणाला, “माणूस आणि कलाकार म्हणून…”
अभिनेते अशोक सराफ यांनी पाच दशकांहून अधिक काळ मराठी आणि हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले असून, त्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखले जाते. आज त्यांचा ७८ वा वाढदिवस आहे. याबद्दल अभिनेता इंद्रनील कामतने त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल त्याने असं म्हणतो, "अशोक सराफांबरोबर काम करत असताना कामावर निष्ठा कशी ठेवावी हे समजून घेता आलं. माणूस आणि कलाकार म्हणून त्यांना अनुभवता आलं. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हा स्वामींचाच आशीर्वाद समजतो.”