अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त पत्नी निवेदिता यांची खास पोस्ट, म्हणाल्या…
अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या विनोदाने आणि आशयघन भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांनी १०० हून अधिक नाटकं आणि २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज त्यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनीही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, "तुला पती म्हणून लाभणं हीच माझी मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुझ्या आयुष्याच्या प्रवासाचा मी एक भाग आहे, याचा मला नेहमीच अभिमान वाटतो."