छाया कदम यांचा हिमाचल सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मान, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाल्या…
अभिनेत्री छाया कदम यांना हिमाचल प्रदेश राज्य सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'फँड्री', 'सैराट', 'झुंड' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याने त्या आनंदित झाल्या. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा सन्मान महाराष्ट्राचाही असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.