Video : छाया कदम यांनी पहिल्यांदाच अनुभवली पंढरपूरची वारी, खास व्हिडीओ केला शेअर
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची वारकऱ्यांना ओढ असते. यंदाच्या वारीत मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सहभागी झाले होते, ज्यात अभिनेत्री छाया कदम आणि पायल जाधव यांचा समावेशही झाला आहे. छाया कदम यांनी वारीतील अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी वारीतील अश्वांचे दर्शन घेतले, रिंगण सोहळ्यात सहभागी झाल्या आणि पारंपरिक खेळही खेळले. त्यांच्या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती व्यक्त केली आहे.