गश्मीर महाजनी लवकरच ‘बिग बॉस’मध्ये दिसणार? शोमधील सहभागाबाबत व्यक्त केली इच्छा, म्हणाला…
गश्मीरने 'देऊळबंद', 'कॅरी व मराठा', 'कान्हा', 'धर्मवीर', 'सरसेनापती हंबीरराव' आणि 'फुलवंती' यांसारख्या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'झलक दिखला जा' आणि 'खतरों के खिलाडी'सारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. अशातच गश्मीर महाजनीने 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना ही इच्छा व्यक्त केली.