बैलासमोर नाचलेली गौतमी पाटील, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूबद्दल म्हणाली, “कार्यक्रम छान…”
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणावर गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. हगवणे कुटुंबाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमीने डान्स केला होता, ज्याचा व्हिडीओ वैष्णवीच्या मृत्यूनंतर व्हायरल झाला. गौतमीने या घटनेला दुर्दैवी म्हटले आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. तिने स्पष्ट केले की, कलाकार म्हणून ते फक्त कला सादर करतात आणि इतर गोष्टींमध्ये त्यांना सहभागी करू नये.