हृता दुर्गुळेला पुरस्कार मिळाल्यानंतर नवऱ्याची भावूक पोस्ट, बायकोचं केलं कौतक
हृता दुर्गुळेने 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'अनन्या' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार जिंकला. तिच्या नवऱ्याने, दिग्दर्शक प्रतीक शाहने, सोशल मीडियावर तिचं कौतुक करत पोस्ट शेअर केली. हृतानेही सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपटाचे दिग्दर्शक प्रताप फड आणि निर्माते रवी जाधव यांचे आभार मानले. 'अनन्या' चित्रपट २२ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता.