सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या ‘त्या’ आजोबांना केदार शिंदेंनी दिली खास भेट
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या यवतमाळमधील इंगोले आजोबांना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हार्मोनियम भेट दिली. आषाढी वारीच्या वेळी आजोबांचे विठुरायाची गाणी गातानाचे व्हिडीओ पाहून केदार शिंदेंनी त्यांना हार्मोनियम देण्याचा निर्णय घेतला. राहुल धांडे यांच्या मदतीने आजोबांचा पत्ता मिळवून हार्मोनियम पोहोचवली. केदार शिंदेंच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.