केदार शिंदे आणि भरत जाधव यांच्यात नऊ महिने होता अबोला, नेमकं काय घडलेलं?
मराठी मनोरंजन विश्वातील केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांच्या मैत्रीची चर्चा नेहमीच होते. केदार शिंदे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, काही गैरसमजांमुळे केदार आणि भरत नऊ महिने एकमेकांशी बोलले नव्हते. मात्र, नंतर ते पुन्हा एकत्र आले. केदार यांनी सांगितले की, त्यांच्या मैत्रीत कोणताही स्वार्थ नाही आणि त्यांचे व्यवहार नेहमीच चांगले राहिले आहेत.