सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ फ्लॉप का झाला? केदार शिंदेंनी पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना
'बिग बॉस मराठी ५' विजेता सूरज चव्हाणला घेऊन केदार शिंदे यांनी 'झापुक झुपूक' चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र, हा चित्रपट तिकीटबारीवर अपयशी ठरला. केदार शिंदे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या अपयशाचे कारण सांगितले. त्यांनी मान्य केले की, कदाचित त्यांच्या विचारांत काहीतरी चूक होती. त्यांनी पुढे सांगितले की, आता प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करण्याचे प्रयत्न ते करत आहेत.