महेश मांजरेकर यांनी केलं राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या त्रिशा ठोसर व भार्गव जगतापचं कौतुक
महेश मांजरेकर सध्या त्यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी या चित्रपटातील बालकलाकार त्रिशा ठोसर व भार्गव जगताप यांचं कौतुक केलं आहे. 'नाळ २' चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. महेश मांजरेकर यांनी त्रिशा व भार्गव यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांच्यासाठी सिनेमा करण्याचं ठरवलं. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' ३१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.