“कलाकार झालो; पण ते बघायला बाबा नव्हते…”, दिलीप प्रभावळकरांनी सांगितली वडिलांची आठवण
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी 'दशावतार' सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत वडिलांची एक भावुक आठवण शेअर केली. ते म्हणाले, "मी सायन्सचा विद्यार्थी होतो आणि नोकरी करत होतो. नाटक-सिनेमा करताना धावपळ बघून वडिलांनी मला यातच करिअर करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला मी त्यांच्यावर चिडलो, पण नंतर पूर्णवेळ अभिनेता झालो. दुर्दैवाने, तेव्हा वडील नव्हते."