कविता मेढेकरांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण, मुलाच्या जन्मानंतर दिलेला खास सल्ला
मराठी सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे आजही सर्वांच्या आठवणीत आहेत. २००४ साली त्यांनी निरोप घेतला, परंतु त्यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. आजवर अनेकांनी त्यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. अशातच अभिनेत्री कविता मेढेकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची जुनी आठवणी शेअर केली आहे.लक्ष्मीकांत बेर्डेंनी तू आता तुझ्या मुलाकडे लक्ष दे असं कविता यांना सांगितलं होतं.