OLA कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप; म्हणाली…
मुंबई-पुणे सारख्या शहरांत 'ओला-उबेर' कॅब सेवा सुरक्षित प्रवासासाठी पसंत केली जाते. मात्र, काही वेळा या कंपन्या ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेतात. अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीने 'ओला'च्या वर्तणुकीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने वेळेवर पैसे भरूनही वारंवार दंडाचे मेसेजेस येत असल्याची तक्रार केली आहे. तिच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनीही त्यांच्या तक्रारी शेअर केल्या आहेत.