मराठी अभिनेत्रीने सांगितला रितेश देशमुखबरोबर काम करण्याचा खास अनुभव, म्हणाली…
मराठी अभिनेत्री रितिका क्षोत्रीने 'रेड २' चित्रपटात रितेश देशमुख आणि अजय देवगणबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला. रितिकाने सांगितले की, रितेश देशमुखबरोबर पहिला सीन करताना ती खूप उत्सुक होती आणि रितेशने तिच्या क्लोज सीनसाठी सेटवर थांबून तिला प्रोत्साहन दिले. अजय देवगणबरोबरचा सीन चार मिनिटांत शूट झाला, पण क्लायमॅक्स शूट करताना ती भारावून गेली.