हातात टाळ, डोक्यावर तुळस अन्…; पंढरपूरच्या वारीत सहभागी झाली मराठी अभिनेत्री, म्हणाली…
मराठी अभिनेत्री सायली पाटीलने आषाढी वारीत सहभाग घेतला आणि तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. तिने वारकऱ्यांसह पायी वारी केली, पारंपरिक खेळ आणि फुगडीही खेळली. सायलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सायली पाटीलने 'झुंड', 'घर बंदूक बिर्यानी' आणि 'येक नंबर' चित्रपटांमध्ये काम केले आहे.