सायली संजीव लवकरच राजकारणात करणार एन्ट्री! स्वत:च व्यक्त केली इच्छा, म्हणाली…
अभिनेत्री सायली संजीव 'काहे दिया परदेस' मालिकेतून प्रसिद्ध झाली. अभिनय क्षेत्रात सक्रीय असलेल्या सायलीला राजकारणातही रस आहे. 'सुमन म्युझिक मराठी'च्या पॉडकास्टमध्ये तिने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली. तिने तरुणांनी राजकारणाला करिअरचा पर्याय मानावा असे मत मांडले. सायलीने स्वच्छता, रस्ते सुधारणा यांसारख्या समस्यांवर काम करण्याची तयारी दर्शवली.