मराठी दिग्दर्शकाने सांगितला सुनील गावसकरांबरोबरच्या विमान प्रवासाचा किस्सा, वाचा…
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांनी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना भेटल्याचा एक खास किस्सा सांगितला. चेन्नईहून मुंबईला येताना, विमानात उशिरा पोहोचल्यामुळे संजय यांना वाटलं की, विमान त्यांच्यासाठी थांबलंय. मात्र, विमान सुनील गावसकर यांच्यासाठी थांबलं होतं. गावसकर त्यांच्या शेजारी बसले आणि संजय यांनी दोन तास गप्प बसून प्रवास केला. गावसकरांना भेटण्याचा हा अनुभव संजय यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला.