सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट का चालला नाही? मिलिंद गवळींनी सांगितलं कारण; म्हणाले…
'बिग बॉस मराठी ५' विजेता सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' सिनेमा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला होता. सिनेमाला अपेक्षित यश मिळाले नाही. अभिनेते मिलिंद गवळी यांनी सांगितले की, सूरजच्या अभिनयाचे कौतुक झाले, परंतु प्रेक्षक थिएटरमध्ये आले नाहीत. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांची थिएटरमध्ये येण्याची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे 'झापुक झुपूक'ला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नसले तरी तो यशस्वी सिनेमा आहे.