आईच्या आठवणीत मृणाल कुलकर्णी भावुक, म्हणाल्या, “शेवटचा संस्कार…”
प्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक डॉ. वीणा देव, म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आईचं गेल्यावर्षी निधन झालं. मृणाल यांनी आईच्या आठवणींवर भावुक पोस्ट शेअर केली होती. आईच्या निधनानंतर मृणाल यांनी अनेकदा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणाल यांनी आईच्या संस्कारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी आजारी माणसाशी कायम प्रेमानेच बोलायचं या आईच्या शेवटच्या संस्काराबद्दलही बोलल्या.