प्राजक्ता कोळीचं मराठीत पदार्पण! ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’मध्ये झळकणार
लोकप्रिय मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमे 'क्रांतीज्योती विद्यालय - मराठी माध्यम' हा नवा सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकणार आहे. मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या आणि मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व या विषयावर आधारित हा सिनेमा आहे.