“तेव्हाच त्यांची प्रकृती बिघडली अन्…”, प्रसाद ओकने सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दलची आठवण सांगितली. एका मुलाखतीत प्रसादने लक्ष्मीकांत यांच्याबरोबर नाटकाच्या तालमीसाठी १५-२० दिवस काम केल्याचे सांगितले. त्यावेळी लक्ष्मीकांत यांची प्रकृती बिघडल्याने नाटक पूर्ण होऊ शकले नाही. प्रसादने लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डे याचेही कौतुक केले आणि त्याच्याबरोबर काम करण्याचा आनंद व्यक्त केला.