“ट्रेंड्स फॉलो करतो, तसे नियम पाळले तर…”, प्रथमेश परबच्या पत्नीचा व्हिडीओ चर्चेत; म्हणाली…
सध्या सोशल मीडियावर जेमिनीच्या Banana AI Saree ट्रेंडची धूम आहे. अनेक कलाकार आणि सामान्य लोक या ट्रेंडचे फोटो शेअर करत आहेत. प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकरनेही या ट्रेंडवर आधारित एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने एक किस्सा सांगितला आहे, ज्यात तिने सोशल मीडियावरील ट्रेंड्स फॉलो करण्याऐवजी खऱ्या आयुष्यातील साधे नियम पाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तिच्या या विचारांना अनेकांनी समर्थन दिले आहे.