प्रिया-उमेशच्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, १२ वर्षांनी एकत्र झळकणार
प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल 'बिन लग्नाची गोष्ट' या नव्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात लग्न न करता लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याची कथा आहे. गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. समीर कुलकर्णी यांनी कथा लिहिली असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे आहे. सिनेमा १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.