“संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले”, सांस्कृतिक मंत्र्यांनी विवेक लागूंना वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विवेक लागू यांचे १९ जून २०२५ रोजी निधन झाले. ते दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. त्यांच्या निधनानंतर चाहते, राजकीय नेते आणि कलाविश्वातील सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनीही शोक व्यक्त केला. विवेक लागू यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे.