तुला कसा बेटर हाल्फ हवाय? रिंकूने दिलं ‘हे’ उत्तर, तर प्रार्थना दिलाय ‘हा’ खास सल्ला
‘सैराट’मधील आर्चीच्या भूमिकेमुळे रिंकू राजगुरु महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. 'सैराट'नंतर ती इतर सिनेमे आणि सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. लवकरच तिचा 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' सिनेमा येणार आहे. एका मुलाखतीत रिंकूने सांगितलं की, तिला साधी आणि चांगली माणसं आवडतात. प्रार्थना बेहेरेने तिला करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' २२ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.