सई ताम्हणकरला करायचं होतं आमिर खानशी लग्न, स्वत: केला खुलासा; म्हणाली, “मला तो आवडायचा…”
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने आमिर खानबद्दल तिच्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या. सईने सांगितले की ती लहानपणापासून आमिरची मोठी चाहती आहे आणि तिने आईकडे आमिरशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सईने 'गजनी' चित्रपटात आमिरसोबत काम केले आहे. तिने सांगितले की, तिच्या इच्छाशक्तीमुळे हे शक्य झाले. 'गजनी'नंतर सईने पाणी फाऊंडेशनच्या निमित्ताने आमिरसोबत पुन्हा काम केले.