‘सैराट’ फेम अभिनेता गावाकडे करतोय शेती, स्वत:च्या हातांनी बनवला ‘हा’ पदार्थ
‘सैराट’ चित्रपटातील ‘लगंड्या’ म्हणून ओळखला जाणारा तानाजी गालगुंडे शेतीकामातही पारंगत आहे. तानाजीने आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेतात घोसावळ्याची भाजी बनवण्याची रेसिपी शेअर केली आहे. त्याने शेतातच दगडांची चूल बनवून भाजी तयार केली आणि शेताच्या किनारी तिचा आस्वाद घेतला. तानाजीच्या साधेपणाने अनेकांना प्रभावित केले आहे. ‘सैराट’नंतर तानाजीने ‘गस्त’, ‘झुंड’ यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे.