“ज्यासाठी केला अट्टाहास…”, महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाल्यानंतर संतोष जुवेकरची पोस्ट
अभिनेता संतोष जुवेकरने 'झेंडा', 'मोरया', 'शाळा', 'बॉईज' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यंदा त्याला 'रावरंभा' चित्रपटातील जालिंदर भूमिकेसाठी ६१वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला. संतोषने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.