“भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका कशासाठी?” शुभांगी गोखलेंचा थेट सवाल; वारीबद्दलची पोस्ट चर्चेत
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. यंदाच्या वारीत अनेक मराठी कलाकारही सहभागी झाले आहेत. अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियावर वारीबद्दल परखड मत व्यक्त केले आहे. त्यांनी वारीत भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करणाऱ्या हौशी मंडळींवर टीका केली आहे. त्यांच्या या पोस्टला अनेकांनी सहमतीही दर्शवली आहे.