श्वेता मेनन कायदेशीर अडचणीत, अश्लील सिनेमातून पैसे कमावल्याप्रकरणी तक्रार दाखल
९० च्या दशकात सलमान खानसोबत 'बंधन' चित्रपटात काम केलेली अभिनेत्री श्वेता मेनन कायदेशीर अडचणीत सापडली आहे. तिच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप असून, सामाजिक कार्यकर्ता मार्टिन मेनाचेरी यांनी तक्रार दाखल केली आहे. एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी तिच्यावर आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. श्वेताने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही, त्यामुळे तिची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.